अमृता सेनाड यांनी रांगोळीतून साकारले १२ हजार स्क्वेअर फुटाचे गणराया!
कला हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या भजनात म्हटलेलं आहे की 'एक तरी अंगी असू दे कला' याच उक्तीला अनुसरून अकोला शहरातील ख्यातनाम सिध्दहस्त रांगोळी आर्टिस्ट अमृता कुशल सेनाड यांनी तब्बल १२ हजार स्क्वेअर फुटाची रांगोळी साकारून एक विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. नंद उद्यान, गणपती संग्रहालय चिखलदरा आणि नंद मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भारतातील सर्वात मोठी गणपती साकारल्याबध्दल या विक्रमाची 'लंडन बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद झाली आहे.
गणपती संग्रहालयाचे संचालक प्रदीप नंद तसेच व्यवस्थापक डॉ.माधव देशमुख यांच्या लंडन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली नोंद प्रेरणेने अकोल्यात विश्वविक्रमाची नोंद झाली आहे. याप्रसंगी रांगोळी आर्टिस्ट अमृता सेनाड यांना प्रदीप नंद आणि सौ. दिपाली नंद यांच्या हस्ते लंडन बुक ऑफ रेकॉर्ड हे प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच प्रदीप नंद व दिपाली नंद यांचा देखील लंडन बुक ऑफ रेकॉर्ड हे प्रमाणपत्र देऊन

भाजप महिला आघाडीच्या सुहासिनी धोत्रे, मंजुषा सावरकर, गंगादेवी शर्मा, अर्चना शर्मा, सुमनताई गावंडे, वैशाली शेळके, गीतांजली शेगोकार, सारिका जयस्वाल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून बाभुळगावचे उपसरपंच शाहरुख खान पठाण उपस्थित होते. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी व्यवस्थापक डॉ. माधव देशमुख यांच्या मार्गदर्शनात सुधाकर देशमुख,राज पवित्रकार, श्रीकांत देशपांडे, आतिक पठाण, अविनाश पाटील, धनंजय तायडे तसेच प्रदीप नंद
मित्र मंडळाचे सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ. माधव देशमुख, संचालन नंदकिशोर डंबाळे तर आभार अविनाश पाटील यांनी मानले.
अकोला में बनाई गई गणपति बप्पा की 12000 फुट में विशाल रंगोली । Akola Rangoli
Akola - 12 हजार क्वेयर फूट में गणपति बाप्पा की रंगोली